Club World Cup : मेस्सीच्या मियामीचा आता ‘पीएसजी’विरुद्ध सामना, पाल्मिरासची पिछाडीवरून बरोबरी; अखेरच्या १० मिनिटांत गोल
Lionel Messi : क्लब विश्वकरंडक स्पर्धेत इंटर मियामीने दोन गोलांची आघाडी घेतली होती, मात्र पाल्मिरासने शेवटच्या क्षणांत दोन गोल करत सामना २-२ ने बरोबरीत संपवून बाद फेरीत प्रवेश मिळवला.
मियामी : दोन गोलांची पिछाडी भरून काढणाऱ्या पाल्मिरास क्लबने लिओनेल मेस्सीच्या इंटर मियामी क्लबला २-२ असे बरोबरीत रोखले आणि क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इंटर मियामीसह बाद फेरीत प्रवेश केला.