esakal | WTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant, KL Rahul

WTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : धडाकेबाज ऋषभ पंत याच्या तुफानी फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ऋषभ पंत याच्या फलंदाजीत सातत्य आल्याचं दिसत आहे. त्यामुळेच प्रतस्पर्धी संघानं त्याची धास्ती घेतली आहे. न्यूझीलंडचे गोलदाजी कोच शेन जुरगेंसेन यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऋषभ पंतपासून (Rishabh Pant) सावधान राहण्याचा इशारा आपल्या संघाला दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत जुरगेंसेन म्हणाले की, "पंत खतरनाक आणि विस्फोटक फलंदाज आहे. एकट्याच्या जिवावर सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरोधात त्याची क्षमता आपण पाहिली आहे. पंत सकारात्मकतने प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करतो. आगामी सामन्यात त्याच्यापासून सावध राहायला हवं." पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार प्रदर्शन केलं होतं. भारताच्या विजयात पंतचा सिंहाचा वाटा होता. यंदा पंतने सहा कसोटी सामन्यात 64.37 च्या सरासरीनं 515 धावा चोपल्या आहेत.

हेही वाचा: WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

जुरगेंसेन म्हणाले की, "पंतविरोधात आम्ही रणनिती आखणार आहोत.आमच्या गोलंदाजाना सर्वोत्म कामगिरी करावी लागेल. तसेच सयंमाने गोलंदाजी करावी लागेल. तसेच पंतला धावा काढण्यापासून रोखायला हवं. पंतला धावा काढण्यापासून रोखणं सोप्प नव्हे, हे लक्षात ठेवायला हवं." पुढे बोलताना जुरगेंसेन यांनी भारतीय गोलंदाजाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, भारतीय संघाकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. विविध पर्याय उपलब्ध आहेत. बुमराहपाहून शार्दुल ठाकूरपर्यंत भारतीय संघाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सिराज आणि फिरकी गोलंदाज कोणत्याही संघासाठी डोकेदुखी ठरु शकतील.