esakal | Paralympic : भारताचे सुवर्णस्वप्न भंगलं, सुहास यथिराजला रौप्य
sakal

बोलून बातमी शोधा

Paralympic : भारताचे सुवर्णस्वप्न भंगलं, सुहास यथिराजला रौप्य

Paralympic : भारताचे सुवर्णस्वप्न भंगलं, सुहास यथिराजला रौप्य

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Tokyo 2020 Paralympic : भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 4 गटात भारताचा सुहास यथिराज आणि फ्रान्सचा लुकास मजूर यांच्यात अंतिम सामना रंगला होता. अटीतटीच्या सामन्यात लुकास मजूर याने सुहास यथिराज याचा 1-2 च्या फरकाने पराभव करत सुवर्णपदाकाला गवसणी घातली आहे. सुहास यथिराज याने रौप्य पदकाची कमाई केली आहे.

बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 4 गटातील अंतिम सामन्यात सुहास यथिराज याचा 21-15, 17-21, & 15-21 अशा सरळ सेटमद्ये पराभव झाला. सुहास यथिराज याने पहिला सेट जिंकत सामन्यात बाजी मारली होती. मात्र, फ्रान्सचा लुकास मजूर याने दमदार पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकले.

loading image
go to top