.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पॅरिस : टोकियो पॅरालिंपिकमध्ये विक्रमी १९ पदकांवर मोहोर उमटवल्यानंतर आता भारतीय खेळाडू उद्यापासून (ता. २८) पॅरिस येथे सुरू होत असलेल्या पॅरालिंपिकमध्ये पदकांची सिल्व्हर ज्युबिली (२५) गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील. या क्रीडा महोत्सवात भारताकडून १२ खेळांमध्ये ८४ खेळाडूंचा सहभाग लाभला असून यंदा दुहेरी आकड्यांत सुवर्णपदक जिंकण्याचा मानसही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.