भारताला पाकमध्ये यायचं नसेल तर आशिया कपमधूनच हाकला!

वृत्तसंस्था
Thursday, 20 February 2020

''एसीसी भारताशिवाय आशिया कप खेळविण्यास तयार असले तर आम्हाला काहीच हरकत नाही. मात्र, असे होणार नसेल तर आशिया कप पाकिस्तानात होऊ शकत नाही.''

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांमुळे भारत पाकिस्तानात क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी जात नाही. अशातच यंदाचा आशिया करंडक पाकिस्तानात खेळविला जाणार होणार होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला. आता पाकिस्तानच्या हातातून यजमानपद जाण्याची चिन्हे दिसू लागल्यावर पाकिस्तानने एसीसीकडे भारताला आशिया कपमधून हाकलून देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 

दोन महिन्यात दुसरं द्विशतक, हा तर बापासारखाच जबरदस्त फलंदाज निघाला 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन एहसान मानी यांनी आज पाकिस्तान, आशिया करंडकाचे यजमानपद सोडू शकते असे पाकिस्तान क्रिकेट लीगच्या करंडकाच्या अनावरप्रसंगी सांगितले आहे. ते म्हणाले, '' आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे संयुक्त सदस्य असलेल्यांच्या कमाईवर परिणाम होणार नाही याचा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही स्पर्धेचे आयोजन करणे महत्वाचे नाही. सध्या तरी आमचा हट्ट महत्वाचा नाही मात्र, सगळ्यांना सोयीस्कर जागा असे मह्त्वाचे आहे. भारतीय क्रिकेट संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात मोठ्या स्पर्धाही खेळण्यास येणार नाही.''

INDvsNZ : बायको प्रेग्नंट म्हणून तो थांबला घरी; किवींनी बदली खेळाडू बघा कोण बोलावलाय

''एसीसी भारताशिवाय आशिया कप खेळविण्यास तयार असले तर आम्हाला काहीच हरकत नाही. मात्र, असे होणार नसेल तर आशिया कप पाकिस्तानात होऊ शकत नाही,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCB chief Ehsan Mani hints Shifting of Asia Cup venue from Pakistan