पाक क्रिकेट मंडळाला अखेर द्यावे लागले बीसीसीआयला 10 कोटी

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 मार्च 2019

आयसीसीने लवादासमोर हे प्रकरण आणले होते. तेव्हा पाक मंडळाला हार पत्करावी लागली होती. त्याचवेळी लवादानेच नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपये बीसीसीआयला देण्याचा आदेश दिला होता.​

कराची : आयसीसीच्या विवाद समितीसमोर हार पत्करावी लागल्यानंतर पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) बीसीसीआयला नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी 98 लाख रुपये दिल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी सोमवारी दिली. भारताने द्विपक्षीय मालिका खेळण्याच्या कराराचा भंग केल्या प्रकरणी पाक मंडळाने आयसीसीकडे दाद मागितली होती.

आयसीसीने लवादासमोर हे प्रकरण आणले होते. तेव्हा पाक मंडळाला हार पत्करावी लागली होती. त्याचवेळी लवादानेच नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपये बीसीसीआयला देण्याचा आदेश दिला होता. मणी म्हणाले,"आम्ही या प्रकरणात जवळ जवळ 15 कोटी रुपये गमावले आहेत. बीसीसीआयला नुकसान भरपाईसोबत कायदेशीर शुल्क आणि प्रवास खर्च याचाही समावेश होता.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCB pays 10 cr to BCCI