Pervez Musharraf Death Sourav Ganguly : वाघा बॉर्डरवरून उचलले... सौरव गांगुलीच्या उत्तराने परवेज मुशर्रफ उडालेच!

Pervez Musharraf Sourav Ganguly
Pervez Musharraf Sourav Gangulyesakal

Pervez Musharraf Sourav Ganguly : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांचे आज (दि. 05) सकाळी निधन झाले. दुबईमध्ये त्यांच्यावर रूग्णालयाच उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. मुशर्रफ हे पाकिस्तानमधील एक वादग्रस्त व्यक्तीमत्व होतं. कारगील युद्धाचा कट त्यांनीच रचला होता. तसेच यांच्यात कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांनी पाकिस्तानचा दौरा देखील केला होता. त्यांच्या निधनानंतर या दौऱ्यावरील आठवणींना उजाळा मिळत आहे.

Pervez Musharraf Sourav Ganguly
Asia Cup 2023 BCCI vs PCB : जाळ अन् धूर निघाला संगटच! शहा - सेठी बैठकीत भिडले

भारताचा कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानचा 2006 मध्ये दौरा केला होता. या दौऱ्याचे जरी गांगुली, तेंडुलकर, द्रविड आणि लक्ष्मण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असले तरी महेंद्रसिंह धोनीने हा दौरा गाजवला होता. त्याच्या प्रेमात खुद्द तत्कालीन राष्ट्रप्रुमख परवेज मुशर्रफ पडले होते. या बाबतचा किस्सा सौरव गांगुलीने अनेक दिवसांनी सांगितला होता.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. कारकिर्दिच्या सुरूवातीलाच महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तान दौऱ्यावर धमाका केला होता. यानंतर गांगुलीला मुशर्रफ यांनी धोनीबाबत विचारणा केली होती. यावेळी गांगुलीने खूप मजेदार उत्तर दिले.

गांगुली म्हणाला होता की, 'मला अजूनही आठवतंय की परवेज मुशर्रफ यांनी मला विचारले होते की तुम्ही धोनीला कुठून आणले? त्यावर मी म्हणालो की, तो वाघा बॉर्डरवर फिरत होता आणि आम्ही त्याला संघात घेतले.'

Pervez Musharraf Sourav Ganguly
Shaheen Afridi Wedding : हे खूप निराशाजनक! इतकी विनंती करून देखील... शाहीन आफ्रिदी लग्नानंतर जाम भडकला

परवेज मुशर्रफ हे महेंद्रसिंह धोनीच्या बॅटिंगबरोबरच त्याच्या हेअर स्टाईलचे देखील चाहते होते. 2005 - 06 मध्ये महेंद्रसिंह धोनीने केस वाढवले होते. पाकिस्तान दौऱ्यावर असताना मुशर्रफ यांनी धोनीच्या हेअरस्टाईलची स्तुती केली होती. तसेच त्याला केस न कापण्याचा सल्ला दिला होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com