esakal | अमेरिकन ओपन टेनिस जोकोविचने गाठले पीट सॅंप्रासला 
sakal

बोलून बातमी शोधा

Pete Samprasala reached the American Open tennis by Djokovic

अमेरिकन ओपन टेनिस जोकोविचने गाठले पीट सॅंप्रासला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. निर्णायक लढतीत त्याने अर्जेंटिनाचा आव्हानवीर जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्यावर तीन सेटमध्ये मात केली. त्याचे हे कारकिर्दीतील 14वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून याबरोबरच त्याने अमेरिकेचे महान टेनिसपटू पीट सॅंप्रास यांना गाठले. 

31 वर्षीय जोकोविचने सफाईदार खेळ केला. डेल पोट्रो त्याला तुल्यबळ आव्हान देण्याची अपेक्षा होती, पण दुसऱ्या सेटचा अपवाद सोडल्यास त्याला संधी अशी मिळालीच नाही. जोकोविचला पहिल्या दोन फेऱ्यांत न्यूयॉर्कमधील उष्ण हवामानात झगडावे लागले होते. तिसऱ्या फेरीपासून पुढे त्याने एकही सेट गमावला नाही. डेल पोट्रोसारखा भक्कम सर्व्हिस करणारा प्रतिस्पर्धी सुद्धा त्याला कडवी झुंज देऊ शकला नाही. 

निर्णायक मुद्दा 
अंतिम फेरीपूर्वी जोकोविचची 41 टक्के सर्व्हिस यशस्वीरीत्या परतविली गेली नव्हती. जोकोविचचे परतीचे फटके (रिटर्न्स) भेदक असतात. त्यामुळे हे अस्त्र निकामी ठरले. पहिल्याच सेटमध्ये हे प्रमाण 17 टक्‍यांपर्यंत खाली आले. 

सॅंप्रास यांच्या उच्चांकाशी मी बरोबरी करणे फार मोलाचे आहे. त्यांच्या विंबल्डनमधील पहिल्या दोन विजेतेपदांमुळे मी प्रेरित झालो. एकेदिवशी त्यांच्यासारखी कामगिरी करण्याचे स्वप्न मी पाहिले. 
- नोव्हाक जोकोविच 

loading image