ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलची निवृत्ती

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

सीडलने 2008 मध्ये भारताविरुद्ध मोहाली येथे झालेल्या कसोटीत पदार्पण केले होते. त्याने कसोटी कारकिर्दीत आठवेळा पाच बळी मिळविण्याची कामगिरी केलेली आहे. 2013-14 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने 23 बळी मिळविले होते.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सीडल याने आज (रविवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याची 11 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिडलने फॉक्स क्रिकेटशी बोलताना म्हटले आहे, की माझ्यासाठी हा निर्णय कठीण आहे, पण हीच वेळ योग्य आहे. ऍशेस राखणे हाच आमचा मुख्य उद्देश होता. अनेक प्रमुख मालिकांमध्ये मी संघासोबत राहिलो आहे. कर्णधार टीम पेनशी मी निवृत्तीबाबत बोललो होतो. मायदेशात अखेरची कसोटी खेळण्याची संधी मला मिळाली. संघाने मला संधी दिल्याबद्दल मी खूप आनंदी आहे.

सीडलने 2008 मध्ये भारताविरुद्ध मोहाली येथे झालेल्या कसोटीत पदार्पण केले होते. त्याने कसोटी कारकिर्दीत आठवेळा पाच बळी मिळविण्याची कामगिरी केलेली आहे. 2013-14 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने 23 बळी मिळविले होते. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-0 अशी जिंकली होती. 2019 मध्ये झालेल्य ऍशेस मालिकेत त्याने अखेरची कसोटी खेळली होती. त्याने कारकिर्दीत 67 कसोटीत 221 बळी मिळविले आहेत. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाकडून 20 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peter Siddle retires from international cricket