

Phoenix Badminton Super League
sakal
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि देशातील अग्रगण्य बॅडमिंटन लीगपैकी एक असलेली फिनिक्स बॅडमिंटन सुपर लीग ९ आणि १० मे रोजी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे होणार आहे. ही लीग महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन तसेच ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव झाला त्यासाठी एकूण १३ लाख ७८ हजार रुपये खर्च करण्यात आले.