PKL : ट्रिपल हेडरचा थरारक अनुभव; तिन्ही सामने सुटले बरोबरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pro Kabaddi League
PKL : ट्रिपल हेडरचा थरारक अनुभव; तिन्ही सामने सुटले बरोबरीत

PKL : ट्रिपल हेडरचा थरारक अनुभव; तिन्ही सामने सुटले बरोबरीत

Pro Kabaddi League 2021 22 11th Day Results : प्रो कबड्डी लीग (PKL) 2021-22 11 व्या दिवशी तीन लढती झाल्या. विशेष म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या तिन्ही लढती बरोबरीत सुटल्या. यूपी योद्धा (UP Yoddha) आणि यू मुम्बा (U Mumba) यांच्यातील सामना 28-28 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या लढतीत बंगळुरु बुल्स (Bengaluru Bulls) विरुद्ध तेलुगू टायटन्स (Telugu Titans) यांच्यातील सामना 34-34 असा बरोबरीत सुटला. हा थरार कमी होता की काय म्हणून शनिवारी दबंग दिल्ली (Dabang Delhi) आणि तमिळ थलायवाज (Tamil Thalaivas) यांच्यातील सामनाही 30-30 असा बरोबरीत सुटला.

प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका थरार पाहायला मिळाला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच ट्रिपल हेडर सामने खेळवण्यात येत आहेत. यात 11 व्या दिवशी कमालीची रंगत अनुभवायला मिळाली. तिन्ही सामन्यात पारडे कधी या बाजूनं तर कधी त्या बाजूनं असे झुकताना दिसले. अखेर तिन्ही सामने बरोबरीत सुटले. या हंगामात आतापर्यंत 7 सामने बरोबरीत सुटले आहेत. यूपीचा रेडर सुरेंद्र गिलने 8 आणि यू मुम्बाचा रेडर अजीत कुमारने 9 पॉइंट्स मिळवले. यू मुम्बाचा स्टार अभिषेक सिंह आणि यूपीचा डुबकी किंग प्रदीप नरवालने 4-4 पॉइंट्स घेतले.

हेही वाचा: ...म्हणून बूम.. बूम... बुमरा झाला उप कॅप्टन!

बंगळुरु बुल्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील दुसऱ्या लढतीत 34-34 असा स्कोअर झाला. या सामन्यात टायटन्सकडून अंकित बेनिवालने सुपर 10 चा पराक्रम केला. तमिळ थलायवाज आणि दबंग दिल्ली यांच्यातील शेवटच्या सामन्यातही चांगलीच रंगत झाली. दिल्लीचा रेडर नवीन कुमारने 15 पॉइंट्स मिळवले. दुसरीकडे थलायवाजकडून मंजीत कुमारने 10 पॉइंट्ससह सुपर 10 कामगिरी केली. पण दोघही आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top