PKL : प्रदीपचा भाव वधारला; राहुलची किंमत घसरली

पाटणा संघाचा आणि प्रो कबड्डीचा विक्रमवीर प्रदीप प्रथमच लिलावात आला
pkl
pklSAKAL
Updated on

मुंबई : कबड्डीतील सुपरस्टार आणि प्रो कबड्डीत दोनदा सर्वाधिक चढायांचा विक्रम करणारा खेळाडू राहुल चौधरीला यावेळच्या लिलावात एकदमच कमी भाव मिळाला. अवघी ४० लाख एवढीच त्याची किंमत ठरली. मात्र डुबकी किंग प्रदीप नरवालला १ कोटी ६५ लाखांची विक्रमी बोली लागली.

आत्तापर्यंत पाटणा संघाचा आणि प्रो कबड्डीचा विक्रमवीर प्रदीप प्रथमच लिलावात आला आणि अपेक्षेप्रमाणे त्याला सर्वाधिक किंमत मिळाली. युपी योद्धाने त्याच्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपये मोजले. आजच्या लिलावात दुसऱ्या क्रमांकाची बोली लागली ती महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईला तेलगू टायटन्सने त्याला १ कोटी ३० लाखांत आपल्या संघातच ठेवले. राहुल चौधरीला ४० लाख देऊन पुणे संघाने आपल्या संघात घेतले. राहुलपेक्षा मनजित, सचिन तन्वर, रोहित गुलिया यांना अधिक किंमत मिळाली.

pkl
Paralympics Update: भारताच्या खात्यात 2 गोल्डसह 8 मेडल

सर्वाधिक बोली

  • प्रदीप नरवाल (यूपी) १. ६५ कोटी

  • सिद्धार्थ देसाई (तेलगू) ९२ लाख

  • मनजित (तमीळ) ९२ लाख

  • सचिन तन्वर (पाटणा) ८४ लाख

  • रोहित गुलिया (हरियाना) ८३ लाख

  • सुरजीत सिंग (तमीळ) ७५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com