
Chess Olympiad : चेस ऑलिम्पियाडसाठी PM मोदींच्या हस्ते मशाल लॉन्च
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर 44 व्या फिडे चेस ऑलिम्पियाड टॉर्च रिलेचा शुभारंभ केला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी येथे उपस्थित लोकांना संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद तसेच इतर बुध्दीबळ खेळाडू देखील उपस्थित होते. (Chess Olympiad 2022)
या वर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघने (FIDE) बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल रिले सुरू केली आहे, जो ऑलिम्पिक परंपरेचा भाग आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कधीही बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये याचा समावेश करण्यात आला नव्हता.
दरम्यान यावर्षी भारतात प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन केले जाणार आहे. चेन्नई येथे जुलै-ऑगस्टमध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होईल. महाबलीपुरम या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी 40 दिवसांच्या कालावधीत मशाल देशातील 75 शहरांमध्ये नेली जाईल. प्रत्येक ठिकाणी त्या राज्यातील बुद्धिबळ ग्रँडमास्टर्सना ही मशाल मिळणार आहे.
या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये 188 देशांतील 2000 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. आतापर्यंत बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये टॉर्च रिले झाले नव्हते परंतु FIDE (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) ने भारतातून प्रथमच टॉर्च रिले करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे
Web Title: Pm Modi Vishwanathan Anand Launch Torch Relay For 44th Chess Olympiad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..