National Sports Day 2019 : 'स्वच्छ भारत'नंतर आता 'तंदुरुस्त भारत'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi announces FIT India movement on the occasion of National Sports Day 2019

National Sports Day 2019 : 'स्वच्छ भारत'नंतर आता 'तंदुरुस्त भारत'!

नवी दिल्ली : संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्यासाठी 'स्वच्छ भारत' योजना सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनी 'तंदुरुस्त भारत' या नव्या योजनेला सुरवात केली आहे.

देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्याचा संदेश देण्यासाठी येथील इंदिरा गांधी मैदानावर या नव्या "तुंदुरुस्त भारत' योजनचा श्रीगणेशा झाला. "खेलो इंडिया' अंतर्गत क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध टप्प्यात ही नवी योजना चार वर्षे म्हणजे 29 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविली जाणार आहे. 

देशातील प्रत्येक जनतेसाठी ही योजना

केवळ खेळाडूंसाठी नाही, तर देशातील आणि परदेशातील प्रत्येक भारतीयांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरक ठरणार आहे. क्रीडा मंत्रालय आणि खेलो इंडिया अंतर्गत तंदुरुस्तीबाबत जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी अव्वल खेळाडूंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करून घेतला जाणार आहे. विविध पातळींवर स्वयंसेवकांची फळी देखील तयार केली जाणार आहे. एका "क्‍लिक'वर योजना सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी मोबाईल ऍप, स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केले जाणार असून, सोशल मिडीयाचाही उपयोग करून घेतला जाणार आहे. 

क्रीडा मंत्र्यांनी साधला संवाद 
केंद्र सरकारची ही योजना प्रत्येक राज्यात पोचविण्यासाठी केंद्रिय मंत्री किरेन रिजीजू स्वतः पुढाकार घेऊन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. 

का साजरा केला जातो आज राष्ट्रीय क्रीडा दिन?

भारताचे दिग्गज हॉकीपटू मेजक ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.