Praggnanandhaa Sister Vaishali : प्रज्ञानंदा अन् वैशालीने रचला इतिहास! ठरले पहिले ग्रँडमास्टर बहीण - भाऊ

Praggnanandhaa sister Vaishali
Praggnanandhaa sister Vaishaliesakal

Praggnanandhaa and sister Vaishali : वैशाली रमेशबाबू ही भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे जिने 2500 रेटिंग पाँईंट्स पार केले आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या कामगिरीबरोबरच वैशाली आणि तिचा लहाण भाऊ प्रज्ञानंदा हे दोघेही बुद्धीबळाच्या इतिहासातील पहिले ग्रँडमास्टर भाऊ - बहीण झाले आहेत.

वैशालीचं पाहूनच प्रज्ञानंदा हा बुद्धीबळाकडे वळला होता. मात्र ज्यावेळी प्रज्ञानंदा हा 2018 ला दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर झाला त्यानंतर प्रज्ञानंदा हा प्रकाशझोतात आला. मात्र त्याची बहीण देखील उत्तम बुद्धीबळपटू आहे. आज तिच्या कामगिरीने प्रज्ञानंदासोबत ती देखील प्रकाशझोतात आली आहे.

Praggnanandhaa sister Vaishali
Pak vs Aus: गजब बेइज्जती है... ऑस्ट्रेलिया विमानतळावर पाकिस्तानी खेळाडूंना स्वतः ट्रकमध्ये भरावं लागलं सामान अन्...

प्रज्ञानंदाची बहीण वैशाली वयाच्या 22 व्या वर्षी अखेर प्रज्ञानंदाच्या सावलीतून बाहेर पडली आहे. त्याची गुणवत्ता आणि कामगिरी कमी नव्हती. ती 15 व्या वर्षी महिला आंतरराष्ट्रीय मास्टर, 17 व्या वर्षी वुमन ग्रँडमास्टर आणि 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर झाली आहे.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार वैशालीच त्यांच्या कुटुंबात पहिल्यांदा बुद्धीबळ खेळायला लागली. ती प्रज्ञानंदापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. तिना आता भारताचा 12 वर्षाचा दुष्काळ संपवला. ती भारताची फक्त तिसरी फिमेल ग्रँडमास्टर बनली आहे. यापूर्वी कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावली या दोघी फिमेल ग्रँडमास्टर झाल्या आहेत.

Praggnanandhaa sister Vaishali
Vijay Hazare Trophy:मुंबईचा जलवा ! विजय हजारे ट्रॉफीत मिळवला सलग पाचवा विजय, शार्दुलने केली अष्टपैलू कामगिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com