

Praggnanandhaa Reaches Grand Chess Tour Final
esakal
सेंट लुईस (अमेरिका): भारताचा स्टार खेळाडू आर. प्रज्ञानंद याने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमर याचा पराभव करीत ग्रँड चेस टूर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाच्या लढतीत आर. प्रज्ञानंदसमोर अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याचे आव्हान असणार आहे. फॅबियानो कारुआना हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून, त्याला यंदाही अजिंक्यपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.