

Chess Champion
esakal
नवी दिल्ली : भारताचा स्टार खेळाडू आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना उल्लेखनीय खेळ केला. याप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी आर. प्रज्ञानंदच्या खेळाचे कौतुक करताना म्हटले की, सध्याच्या घडीला आर. प्रज्ञानंद हा जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याच्यापेक्षाही अधिक धोकादायक खेळाडू आहे. आर. प्रज्ञानंद हा बुद्धिबळ खेळातील लक्षणीय प्रगती केलेला खेळाडू होय.