Chess Tournament : प्रज्ञानंदची गुजराथीवर मात ; आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा ,गुकेश, इयान, फॅबियानो अव्वल स्थानी

हिकारु नाकामुरा याच्यावर विजय मिळवणाऱ्या विदित गुजराथी याला आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत भारताच्याच आर. प्रज्ञानंदकडून हार पत्करावी लागली. प्रज्ञानंदसह त्याची बहीण आर. वैशाली हिनेही महिला विभागात नूरग्यूल सॅलीमोवा हिला पराभूत केले.
Chess Tournament
Chess Tournamentsakal

टोरंटो : हिकारु नाकामुरा याच्यावर विजय मिळवणाऱ्या विदित गुजराथी याला आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत भारताच्याच आर. प्रज्ञानंदकडून हार पत्करावी लागली. प्रज्ञानंदसह त्याची बहीण आर. वैशाली हिनेही महिला विभागात नूरग्यूल सॅलीमोवा हिला पराभूत केले. भाऊबहिणीने हा दिवस गाजवला.

डी. गुकेशकडून दुसऱ्या फेरीत प्रज्ञानंदचा पराभव झाला होता. त्यामुळे प्रज्ञानंदवर तिसऱ्या फेरीत दबाव होता. प्रज्ञानंद- गुजराथी यांच्यामधील लढतीत दोन्ही खेळाडूंकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. काही चालीनंतर गुजराथीचे पारडे जड वाटू लागले; पण ४५व्या चालीनंतर प्रज्ञानंदने विजयाला गवसणी घातली. गुजराथी याप्रसंगी म्हणाला, ‘‘पहिल्या अकरा चालींनंतर ही लढत ड्रॉ होईल असे वाटत होते.

Chess Tournament
IPL 2024 MI vs DC : रोमारिओने उभारली मुंबईच्या विजयाची गुढी ; १० चेंडूंत ३९ धावांचे तुफान

एवढं मात्र निश्‍चित सांगू शकेन की, मी चांगल्या पोझिशनमध्ये होतो.’’ दरम्यान, प्रज्ञानंद याने म्हटले की, ‘‘खेळाच्या सुरुवातीबाबत सांशक होतो; पण काळ्या मोहऱ्यांनी खेळण्यास मी आनंदी होतो.’’ दरम्यान, प्रज्ञानंद व गुजराती यांना प्रत्येकी १.५ गुणांची कमाई करता आली आहे. प्रज्ञानंद चौथ्या व विदित पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

गुकेश- इयानमध्ये ड्रॉ

डी. गुकेश याने दुसऱ्या फेरीत आर. प्रज्ञानंदवर विजय मिळवत मोठी झेप घेतली होती; पण तिसऱ्या फेरीच्या लढतीत त्याला इयान नेपोनियात्चि याचा बचाव भेदता आला नाही. गुकेश- इयान यांच्यामधील लढत ड्रॉ राहिली. तिसऱ्या फेरीअखेर पुरुषांच्या विभागात गुकेश, इयान व फॅबियानो कॅरुआना हे प्रत्येकी दोन गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर विराजमान आहेत.

एकसारखी सुरुवात

आर. प्रज्ञानंद व आर. वैशाली या भाऊ-बहिणीची या स्पर्धेची सुरुवात एकसारखीच झाली. प्रज्ञानंदला पहिल्या फेरीत ड्रॉवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तो पराभूत झाला. अखेर तिसऱ्या फेरीत त्याने विजय मिळवला. वैशालीलाही ड्रॉ, पराभव व विजय असाच सामना करावा लागला. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत अनुक्रमे १.५ गुणांची कमाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com