मरिनने खाल्ला भाव; लिलावात ६१.५ लाख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

सिंधूला ३९ लाख; साईनाची मजल ३३ लाख, श्रीकांत ५१ लाखांपर्यंत

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक सुवर्णपदकविजेत्या कॅरोलिना मरिनला प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लिलावात सर्वाधिक ६१.५ लाख रुपयांचा भाव मिळाला. हैदराबाद हंटर्सने तिला पटकावले. रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या पीव्ही सिंधूसाठी चेन्नई स्मॅशर्सने ३९ लाख रुपये मोजले; तर साईना नेहवालला ३३ लाख रुपयांची कमाई झाली. साईनाला अवघे वॉरियर्सने मिळविले. के. श्रीकांतला ५१ लाखांपर्यंत कमाई झाली.

लिलावात दुसऱ्या क्रमांकाची कमाई दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यून हिला झाली. मुंबई रॉकेट्‌सने तिच्यासाठी ६० लाख रुपये मोजले. पुरुषांमध्ये डेन्मार्कच्या यान ओजोर्गेन्सन याला ५९ लाख रुपयांची बोली लावत दिल्ली एसर्सने मिळविले. डेन्मार्कच्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसनसाठी बंगळूर ब्लास्टर्स; तर वॅन हो सॉनसाठी दिल्लीने प्रत्येकी ३९ लाख रुपये मोजले. या लीगमध्ये १६ ऑलिंपिक पदक विजेत्यांचा सहभाग असेल. ही दुसरी स्पर्धा आहे. ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ची ही सुधारित आवृत्ती मानली जात आहे.

‘पीबीएल’चे मुख्य सल्लागार आणि मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद म्हणाले की, भारतीय खेळाडूंनी रिओ ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे बॅडमिंटन प्रेक्षकांची संख्या बऱ्याच पटींनी वाढली आहे. त्यामुळे ही लीग शक्‍य तेवढी आकर्षक आणि रंगतदार करण्याचा प्रयत्न राहील.’

दृष्टिक्षेपात
एक ते १४ जानेवारीदरम्यान आयोजन
सहा संघ सहभागी
स्पर्धेची बक्षीस रक्कम सहा कोटी रुपये
हैदराबाद, बंगळूर, मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि लखनौमध्ये सामने
१६ ऑलिंपिक पदकविजेते सहभागी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: premier badminton league carolina marin