Prithvi Shaw Attack: धक्कादायक! पृथ्वी शॉवर मुंबईत गुंडांकडून हल्ला, सेल्फीला नकार देणे पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series

Prithvi Shaw Attack: धक्कादायक! पृथ्वी शॉवर मुंबईत गुंडांकडून हल्ला, सेल्फीला नकार देणे पडले महागात

Prithvi Shaw Attack : भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ काही दिवसांनपासून चर्चेत आहे. आता पृथ्वी शॉच्या गाडीवर मुंबईत हल्ला झाला आहे. पृथ्वी शॉ मित्राच्या गाडीत बसला होता. तिथल्या काही लोकांनी त्याला सेल्फी घेण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिल्याने त्यांनी संतप्त होऊन कारवर हल्ला केला. पृथ्वी शॉवरील हल्ल्याप्रकरणी ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

पृथ्वी शॉवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरच्या प्रतीनुसार, आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम १४३, १४८, १४९, ३८४, ४२७, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वी शॉवर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हल्ला झाला. क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 8 अनोळखी लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

रणजी ट्रॉफी सामन्यात 379 धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला भारतीय संघत पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्याची न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवड झाली, पण तो एक सामना खेळला नाही.

टॅग्स :Prithvi Shaw