Team India : 'मी माझ्या खेळात...' टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर 'या' खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Team India
Team Indiasakal

Team India : भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉची कारकीर्द गेल्या 1 वर्षापासून कुठेतरी डगमगल्या सारखे दिसत आहे. 2021 पासून टीम इंडियातून बाहेर असलेला शॉ आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याच वेळी या खेळाडूचे आयपीएल 2023 देखील खूप राहिली होती. मात्र असे असतानाही शॉ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Team India
World Cup 2023 : पाकिस्तानची वर्ल्डकप मधून माघार? क्रीडा मंत्र्याच्या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ

आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केल्यानंतर पृथ्वी शॉ आता भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत खूप मागे पडला आहे. परंतु मुंबईचा हा खेळाडू म्हणतो की, राष्ट्रीय संघात आपले स्थान परत मिळवण्यासाठी तो त्याच्या नैसर्गिक 'आक्रमक' खेळावर अवलंबून राहील. शॉने जुलै 2021 मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी शेवटचा सामना खेळला

मध्य विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यात खेळल्या गेलेल्या दुलीप करंडक सामन्यानंतर शॉ म्हणाला की, मला वैयक्तिकरित्या मला माझ्या खेळात बदल करण्याची गरज वाटत नाही. होय, मी माझा खेळ हुशारीने सुधारू शकतो. मी चेतेश्वर पुजारा सरांसारखी फलंदाजी करू शकत नाही किंवा पुजारा सर माझ्यासारखी फलंदाजी करू शकत नाही.

Team India
Asian Games : एशियन गेम्ससाठी 'या' 4 खेळाडूंचे स्थान निश्चित! लवकरच होणार मोठी घोषणा

श्चिम विभागाच्या सलामीवीराने सांगितले की, ज्याच्या मदतीने मी इथपर्यंत पोहोचलो तेच करण्याचा मी प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ माझी आक्रमक फलंदाजी. मला हे बदलायचे नाही. कारकिर्दीच्या या टप्प्यावर जास्तीत जास्त सामने खेळण्याचा विचार करत आहे. मी दुलीप ट्रॉफी खेळलो किंवा मुंबईसाठी एखादा सामना खेळलो, मला वाटते की माझे सर्वोत्तम देणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

शॉ मात्र दुलीप करंडक उपांत्य फेरीच्या दोन्ही डावांत चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरला. त्याने 25 आणि 26 धावांची खेळी खेळली. शॉ म्हणाला की, येथील परिस्थिती फलंदाजांसाठी आव्हानात्मक होती, परंतु त्यांना सामोरे जाण्याची त्यांची योजना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com