"अ' दौऱ्यातून पृथ्वी शॉ बाहेरच

पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉ

मुंबई : कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक लढतीत खांदा दुखावलेला पृथ्वी शॉ भारतीय "अ' संघातून खेळणार नाही, त्याचबरोबर त्याची आंतरराष्ट्रीय लढतीसाठी संघात निवड होण्याची शक्‍यताही कमी आहे.

पृथ्वीला रोटेटर कफची दुखापत झाली आहे. त्याच्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. तो न्यूझीलंडमध्ये "अ' संघातून खेळू शकणार नाही, असे भारतीय मंडळाने कळवतानाच त्याच्या एकदिवसीय कसोटी सहभागाबाबत निर्णय योग्य वेळी होईल, असे सांगितले आहे.

पृथ्वीच्या खांद्यावरील उपचार किमान तीन आठवडे होतील. पूर्ण तंदुरुस्ती झाल्यावरही त्याला भारतीय संघात जागा कुठे मिळणार आहे. त्याचबरोबर रणजी लढतीत खेळल्यावरच तो भारतीय संघात येऊ शकेल. एकंदरीत तो न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळी संघात पुनरागमन करण्याची शक्‍यता कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com