pro kabaddi 2019 : पुणेरी पलटण संघाचा गतउपविजेत्यांनाही दणका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात पाटण्यात पुणेरी पलटण संघाला खऱ्या अर्थाने सूर गवसला. माजी विजेत्या पाटणा पाटरेट्‌सला धक्का दिल्यावर त्यांनी आज सलग दोनवेळा उपविजेत्या राहिलेल्या गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स संघालाली दणका देत 33-31 असा दोन गुणांनी विजय मिळविला. 

पाटणा - प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात पाटण्यात पुणेरी पलटण संघाला खऱ्या अर्थाने सूर गवसला. माजी विजेत्या पाटणा पाटरेट्‌सला धक्का दिल्यावर त्यांनी आज सलग दोनवेळा उपविजेत्या राहिलेल्या गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स संघालाली दणका देत 33-31 असा दोन गुणांनी विजय मिळविला. 

पाच सामन्यात पुणे संघाचे केवळ दोन विजय झाले असले, तरी यंदाच्या मोसमातील तिसऱ्या टप्प्यात त्यांनी मिळविलेले लागोपाठ दोन विजय हे तुल्यबळ संघांवरील ठरले. दोन्ही विजयात त्यांच्या बचावफळीने चोख काम बजावले. 

पूर्वार्धात एक लोण स्विकारून विश्रांतीच्या 17-14 अशा पिछाडीवरुनही पुणे संघाने बाजी मारली. पाटण्याच्या प्रदीपची कोंडी करणाऱ्या पुण्याच्या बचाव फळीने सचिन तंवर आणि रोहित गुलियाची कोंडी करून गुजरातवर दडपण आणले. यानंतरही सचिनने नऊ गुणांची कमाई करताना संघाला सामन्यात आणण्याचे केलेले प्रयत्न अपुरे पडले. पुण्याकडून पवनकुमार, अमित कुमार आणि गिरीश इरनाक यांनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई केली. गुजरातकडून सचिनने नऊ, तर रोहित गुलियाने सहा आणि जी. बी. मोरेने पाच गुणांची कमाई केली. त्यांची बचाव फळी मात्र कुचकामी ठरली. चढाईत सर्वाधिक 21 गुण मिळवूनही गुजरातला पुण्याचा बचाव खिळखिळा करण्यात अपयश आले. पुण्याने बचावात 13 गुणांची कमाई केली. 

दिल्लीची "दबंग'गिरी 
सलग चार विजय मिळविणाऱ्या जयपूर पिंक पॅंथर संघाला आज दबंग दिल्लीने 35-24 असे रोखले. नवी कुमार आणि चंद्रन रणजित यांच्या खोलवर चढाया दिल्लीच्या विजयात निर्णायक ठरल्या. जयपूरकडून दीपक हुडालाच चमक दाखवता आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pro kabaddi 2019 : puneri paltan won