Pro-Kabaddi : सात ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीचा दम घुमणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pro Kabaddi

Pro-Kabaddi : सात ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीचा दम घुमणार

मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या आगामी मोसमाचे बिगुल वाजले आहे. बंगळूरमधील श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियममध्ये या मोसमातील पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबरपासून पुणे, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या लीगचा मोर्चा वळणार आहे. या स्पर्धेचे संयोजक मशाल स्पोर्टस्‌ यांच्याकडून याबाबतची घोषणा बुधवारी करण्यात आली.

या मोसमात प्रो-कबड्डी लीगच्या लढती स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसांतच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. इतकेच नव्हे तर प्रो-कबड्डी लीगच्या साखळी फेरीत दर शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत.

सलामीची लढत गतविजेता दबंग दिल्ली-यू मुंबा यांच्यामध्ये रंगणार असून त्याच दिवशी दुसरा सामना बंगळूर बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात तर युपी योद्धाज-जयपूर पिंक पँथर्स यांच्यात तिसरा सामना होणार आहे. या स्पर्धेसाठीच्या तिकिटाचे बुकिंग www.prokabaddi.com या सांकेतिक स्थळावर करता येणार आहे.

Web Title: Pro Kabaddi Breathless U Mumbaa Dabangg To Open In Delhi October 7

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..