
Haryana Steelers Winner Of PRO Kabaddi League 11: आज प्रो कबड्डी लीगच्या ११ हंगामात हरियाणा स्टीलर्सने विजेतेपद पटकावले. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमध्ये पार पडलेल्या या सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघाने ९ गुणांनी बाजी मारली. हरियणा स्टीलर्स संघाने सुरूवातीपासूनच पटना पायरेट्सवर वर्चस्व राखले आणि मागचे सलग दोन वर्ष फायनमध्ये येऊन अपयशी होणाऱ्या हरियाणा स्टीलर्स संघाने यावेळी मात्र ट्रॉफी वर आपले नाव कोरले.