Pro Kabaddi League 2022 : बंगळूर बुल्स विजयासह पहिल्या स्थानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pro Kabaddi League 2022 : बंगळूर बुल्स विजयासह पहिल्या स्थानी

Pro Kabaddi League 2022 : बंगळूर बुल्स विजयासह पहिल्या स्थानी

बंगळूर : यजमान बंगळूर बुल्स संघाने रविवारी येथे झालेल्या लढतीत पुणेरी पलटण संघावर ४१-३९ असा रोमहर्षक विजय मिळवला. या विजयास बंगळूर बुल्स संघाने १० गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. विकास कंडोला व भारत या चढाईपटूंच्या दमदार कामगिरीमुळे बंगळूर बुल्सला विजयाला गवसणी घालता आली. विकासने ११ गुणांची, तर भारतने १२ गुणांची कमाई केली.

पुणेरी पलटणकडून अस्लम इनामदार व मोहीत गोयत यांची झुंज अपयशी ठरली. येथे झालेल्या अन्य लढतीत बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सवर ४५-२५ असा दणदणीत विजय संपादन केला. तसेच जयपूर पिंक पँथर्स संघाने पटणा पायरेटस्‌ संघावर ३५-३० अशा फरकाने मात केली.

टॅग्स :sportsKabaddi player