
Pro Kabaddi 2025
sakal
दिल्ली : प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेतील ८९ वा सामना यू मुंबा आणि तेलुगू टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात यू मुंबाने गेल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करत दमदार विजयाची नोंद केली आहे. बचावपटू आणि चढाईपटूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर यू मुंबाने हा सामना ३३- २६ च्या फरकाने जिंकला आहे.