Pro Kabaddi लीगच्या नवव्या मोसमाचा दम लवकरच घुमणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pro Kabaddi League

Pro Kabaddi लीगच्या नवव्या मोसमाचा दम लवकरच घुमणार

Pro Kabaddi : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मोसमाचा दम लवकरच घुमणार आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्‌स यांच्यावतीने प्रो कबड्डी लीगच्या लिलावाचे बिगुल शुक्रवारी वाजले. मुंबईमध्ये येत्या ५ व ६ ऑगस्ट रोजी या स्पर्धेसाठीच्या कबड्डीपटूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये ५००हून अधिक कबड्डीपटूंवर बोली लावण्यात येणार आहे.

हेही वाचा: CWG 2022 : आठ दिवसांवर भारत - पाक सामना तरी खेळाडूंना ना किट ना व्हिसा

प्रो कबड्डी लीगच्या लिलावासाठी चार प्रकारांत कबड्डीपटूंची विभागणी करण्यात येणार आहे. युवा कबड्डीपटू, स्थानिक कबड्डीपटू व परदेशी कबड्डीपटू अशा प्रकारे ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चार गटांमध्ये कबड्डीपटूंची विभागणी करण्यात येणार आहे. गट व मूळ किंमत अनुक्रमे ३० लाख, २० लाख, १० लाख व ६ लाख अशी आहे. तसेच प्रत्येक गटात अष्टपैलू, आक्रमकपटू व बचावपटू अशीही विभागणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी प्रो कबड्डी लीगचा हंगाम कोरोनामुळे बंगळूर येेेथे हॉटेलमध्ये घेण्यात आला होता. ज्यामध्ये ‘दबंग दिल्ली’ने विजेतेपद पटकाविले होेते.

हेही वाचा: Sunil Gavaskar : इंग्लंडमधील स्टेडियमला आता सुनिल गावसकरांचे नाव

कबड्डीपटूंना संघात कायम ठेवता येणार

मागील मोसमात आपल्या संघाकडून खेळलेल्या कबड्डीपटूंना कायम ठेवण्याची संधीही फ्रॅंचायजींकडे असणार आहे. सहा कबड्डीपटू आपल्या संघात त्यांना ठेवता येणार आहेत. तसेच युवा खेळाडूंमधून चार खेळाडूंना अशी संधी दिली जाणार आहे.

खेलो इंडियातील खेळाडूंनाही संधी

प्रो कबड्डी लीगच्या लिलावात यंदा खेलो इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये सहभागी झालेल्या कबड्डीपटूंनाही सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत अव्वल दोन स्थानांवर राहिलेल्या २४ कबड्डीपटूंना लिलावात सहभागी करवून घेतले आहे. या लिलावासाठी प्रत्येक फ्रॅंचायजींना ४.४ कोटी खर्च करण्याची मुभा असणार आहे.

हेही वाचा: WI vs IND Live 1st ODI: भारताचा अवघ्या 3 धावांनी विजय

गट व मूळ किंमत

  • अ- ३० लाख

  • ब- २० लाख

  • क- १० लाख

  • ड- ६ लाख

Web Title: Pro Kabaddi League Ninth Season 500 Players Auction In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top