pro kabaddi Leagueesakal
क्रीडा
Pro Kabaddi League 11: जबरदस्त कमबॅक करत ‘बोनस’ गुणांच्या मदतीने पाटणाचा जयपुरविरूद्ध ४३-४१ असा विजय
Patna Pirates vs Jaipur Pink Panthers: पाटणा पायरेट्स संघाने जयपूर पिंक पँथर्सविरूद्धचा प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामातील ४१ वा सामना ४३-४१ अशा फरकाने जिंकला.
Patna Pirates vs Jaipur Pink Panthers: जयपूर पिंक पँथर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यामधील प्रो कबड्डी लीगमधील शुक्रवारी पार पडलेला साखळी फेरीचा सामना रोमहर्षक ठरला. पाटणाने शेवटच्या पाच मिनिटांत दोन सुपर टॅकल मिळवताना जयपूरला बॅकफूटवर नेले. पाटणाने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करताना बोनस गुणांच्या जोरावर सामना पलटवला.

