
UP Yoddhas vs Tamil Thalaivas : यूपी योद्धाज संघाने प्रो कबड्डी लीगमधील शुक्रवारी पार पडलेल्या लढतीत तमिळ थलैवाज संघावर ४०-२४ असा दणदणीत विजय संपादन केला. यूपी संघाच्या भवानी राजपूतने चढाईत सर्वाधिक १० गुण कमावले. त्याला हितेश (६), आशू सिंग (२), महेंदर सिंग (२), भरत (५) व सुमीत (२) यांनी बचावफळीत उल्लेखनीय साथ दिली. चढाईपटूने केशव कुमारने ३ गुण कमावले. तमिळ संघाच्या नितेशकुमार (६), विशाल चहल (६), मोईन शाफघी (३), आमीर होसैन (२), सचिन (२), अभिषेक (२) व नरेंदर कंडोला (२) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण, आज यूपी संघाचा खेळ वरचढ ठरला.