PKL 2021 : दिल्लीची दबंगगिरी! नवीन एक्सप्रेसचा 'सुपर 10 चौका'

Pro Kabaddi
Pro KabaddiTwitter

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील दबंग दिल्ली (Dabang Delhi) आणि बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) यांच्यातील लढत एकतर्फी झाली. दिल्लीच्या संघाने हा सामना एकहाती जिंकला. दिल्लीचा स्टार रेडर नवीन कुमारने (NaveenKumar) यंदाच्या हंगामात चौथा सुपर 10 चा पराक्रम करुन दाखवला. यंदाच्या हंगामात गुणतालिकेत अव्वल असलेल्या दिल्लीनं सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. त्यांनी पहिल्या हाफमध्ये बंगालच्या संघाला दोन वेळा ऑल आउट केले.

युवा रेडर नवीन कुमारच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने पहिल्या हाफमध्ये 33-15 अशी मोठी आघाडी घेतली. दिल्लीच्या बचावपट्टूनं बंगालचा स्टार रेडर मनिंदर सिंहला पहिल्या हाफमध्ये केवळ तीनच पॉइंट्स दिले. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी सातत्याने गुण मिळवले. पण पहिल्या हाफमधील खेळाच्या जोरावर दिल्लीने सामना 52-35 असा खिशात घातला.

Pro Kabaddi
अबतक 1200 पाॅइंट्स! प्रदीप नरवालनं घातली विक्रमाला गवसणी

नवीन कुमारनं कमावले सर्वाधिक पॉइंट्स

युवा रेडर नवीन कुमारने सातत्याने 25 वेळा सुपर-10 करण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. त्याने बंगाल वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात 24 पॉइंट्सची कमाई केली. त्याचा सहकारी विजयने त्याला उत्तम साथ दिली. त्याने 10 पॉइंट्स कमावले. दुसऱ्या बाजूला बंगालकडून मनिंदरने दुसऱ्या हाफमध्ये दमदार खेळ दाखवला. त्याने 16 पॉइंट्सची कमाई केली. बंगालच्या सुकेश हेगडे यानं 9 पॉइंट्स घेतले. अवघ्या 1 गुणाने त्याची सुपर टेनची संधी हुकली.

Pro Kabaddi
आफ्रिकेच्या कॅप्टनचा 'एल्गार'; तरीही टीम इंडियाला विजयाची संधी

दबंग दिल्ली संघाने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यातील 3 सामने जिंकले आहेत. एक सामना त्यांनी अनिर्णित राखला आहे. अपराजित दिल्लीच्या खात्यात 18 गुण असून ते गुणतालिकेत सर्वात टॉपला आहेत. दुसऱ्या बाजूला बंगाल वॉरियर्सचा संघा 4 सामन्यातील 2 विजय आणि 2 पराभवासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात 11 पॉइंट्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com