Pro kabaddi
Pro kabaddi esakal

Pro Kabaddi season 11 आजपासून; जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् Live Telecast कुठे पाहता येणार

Pro Kabaddi season 11: प्रो कबड्डी लीग २०२४ ला आजपासून सुरूवात होणार आहे. तर, तेलुगु टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यादरम्यान हंगामातील पहिला सामना खेळवण्यात येईल.
Published on

Pro Kabaddi Season 11: प्रो कबड्डी लीगच्या (PKL) ११ व्या हंगामाला आजपासून (१८ ऑक्टोबर) सुरूवात होणार आहे. हंगामातील पहिला सामना तेलुगु टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात होईल. हैदराबादमधील गचीबोवली येथील जीएमसीबी इनडोअर स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. तर दबंग दिल्ली आणि यू मुंबा दरम्यान दुसरा आजच्या दिवसातील दुसरा सामना होणार आहे. १८ ऑक्टोबर पासून २४ २४ डिसेंबर दरम्यान हा हंगाम होणार आहे.

स्थळ :

या वेळी, ही लीग तीन-शहरांच्या फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या आवृत्तीची सुरुवात इंडोर स्टेडियम, गच्चीबाऊली, हैदराबाद येथे होईल. १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत गच्चीबाऊली, हैदराबाद येथे सामने होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नोएडा इंडोर स्टेडियममध्ये येथे दिनांक १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान सामने होणार आहेत. तर तिसरा टप्प्यातील सामने ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये सुरू होईल.

Pro kabaddi
हमाली करणाऱ्या वडिलांचा 'भार' लेकानं उचलला! तुषार आधवडे कबड्डीचं मैदान गाजवून देतोय कुटुंबाला आधार

लाईव्ह टेलिकास्ट:

टीव्ही वर स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी या चॅनल्सवर वर लाईव्ह सामने पाहता येतील. तर मोबाईलवर डिझनी प्लस हॉस्टारवर सामने पाहता येतील.

वेळ :

पहिला सामना तेलुगु टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स दरम्यान ८ वाजता सुरू होणार आहे. तर दबंग दिल्ली आणि यु मुंबा दरम्यान दुसरा सामना ९ वाजता सुरू होणार आहे.

Pro kabaddi
Inspirational Story : हरियानाच्या मनजीत दहीयाने कमावले ८० लाख! नोकरीच्या आशेने कबड्डीची सुरुवात, आर्मीची साथ अन् आता...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com