Propose Day 2022 : 'नारायण..नारायण...' KKR नं केली फिरकीपटूची गंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KKR Viral Post

Propose Day 2022 : 'नारायण..नारायण...' KKR नं केली फिरकीपटूची गंमत

दुबईच्या मैदानात पार पडलेल्या आयपीएल 2020 (IPL2020) स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. या रोमहर्षक सामन्याची जवढी चर्चा झाली त्यापेक्षा कित्येकपटीन या सामन्यातील अपांयर (cricket umpire) चर्चेत आले होते. लांब केस असणारा लूक पाहून अनेक जणांना गोंधळात पाडणाऱ्या अंपायरसोबत केकेआरन सुनील नरेनचा फोटो शेअर करत त्याची गंमत केली आहे. आयपीएलच्या मैदानात नव्या लूकन उतरलेल्या त्या अंपायरचा लूक पाहून अनेकांना अपायरिंग करणारी व्यक्ती पुरुष की महिला असा प्रश्न पडला होता.

प्रपोज डेच्या निमित्तान हाच जुना मुद्दा लक्षात ठेवून कोलकाता नाईट रायडर्संन (Kolkata Knight Riders) आपल्याच गोलंदाजाची शाळा घेतलीये. कोलकाता संघाने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक फोटो शेअर केलाय. या फोटोत कॅरेबियन स्टार सुनील सुनील नरेन आयपीएल जर्सीसत दिसतो. अंपायर पश्चिमी पाठक यांच्यासमोर सुनील नरेननं प्रपोज कलं आणि त्याला येस असं उत्तरही मिळालं, असे गंमतीशीर कॅप्शन केकेआरनं या पोस्टला दिले आहे. नेटकरी या ट्विटचा चांगलाच आनंद घेत आहेत.

हेही वाचा: U19 विजेतेपदाने हुरळून गेलो नाही; IPL बाबत यश धुलचे मोठे वक्तव्य

आगामी आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी (IPL Auction 2022) कोलकाता नाईट रायडर्संने ज्या चार खेळाडूंना रिटेन केलं (KKR Retained Players List) त्यात सुनील नरेनचाही समावेश आहे. कॅरेबियन अष्टपैलू आंद्रे रसेलसाठी (Andre Russell) कोलकाताच्या संघाने सर्वाधिक 12 कोटी मोजले आहेत. वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांना प्रत्येकी 8 कोटी तर सुनील नरेनसाठी (Sunil Narine) फ्रेंचायझीनं 6 कोटी मोजले आहेत.

कोण होते लांब केस ठेवलेले ते अंपायर

आयपीएलमध्ये आपल्या लूकनं चर्चेत आलेल्या अंपायरचे नाव पश्चिम पाठक असे आहे. आयपीएलपूर्वी त्यांनी 2014 मध्ये त्यांनी आयपीएलमध्ये पहिल्यांदा अंपायरिंग केली होती. 2012 मध्ये महिला वऩे सामन्यातही ते पंच म्हणून मैदानात दिसले होते. पण लांब केसाच्या त्यांच्या लूकमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

Web Title: Propose Day 2022 Kolkata Knight Riders Hilarious Post Sunil Narine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..