Club World Cup 2025 : पीएसजीचा मियामी क्लबवर धडाकेबाज विजय; क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा ,लिओनेल मेस्सी प्रभावहीन
Messi Outplayed : क्लब विश्वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत PSG ने लिओनेल मेस्सीच्या इंटर मियामीवर ४–० असा दणदणीत विजय मिळवून वर्चस्व गाजवले. जू नेवेसच्या दोन झंझावाती गोलमुळे सामना पहिल्याच अर्ध्यात PSGच्या बाजूने झुकला.
ॲटलांटा : चॅम्पियन्स लीग जिंकून युरोपातील अव्वल क्लब म्हणून दरारा निर्माण करणाऱ्या पीएसजीने लौकिकाप्रमाणे धडाकेबाज कामगिरी केली. लिओनेल मेस्सीच्या इंटर मियामी क्लबचा ४-० असा धुव्वा उडवून क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.