PSL : राशिद खानचा नागिन डान्स; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PSL Rashid Khan Nagin Dance

राशिद खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास व्हिडिओ शेअर केलाय. त्याने व्हिडिओला खास कॅप्शन दिले आहे.

PSL : राशिद खानचा नागिन डान्स; व्हिडिओ व्हायरल

Rashid Khan Nagin Dance : पाकिस्तान सुपर लीग 2022 (PSL 2022) स्पर्धेतून अफगानिस्तान स्टार राशिद खानने (Rashid Khan) माघार घेतली आहे. अफगाणिस्तानचा संघ बांगलादेश विरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळेच राशिद खानला पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2022)स्पर्धा निम्म्यावर सोडून जावे लागले. पाकिस्तानी खेळाडूंनी त्याला मजेशीर अंदाजात बाय बाय केल्याचे पाहायला मिळाले. राशिद खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास व्हिडिओ शेअर केलाय. त्याने व्हिडिओला खास कॅप्शन दिले आहे. या क्षणी निशब्द आहे. सर्वांचे धन्यवाद!

हेही वाचा: VIDEO: पाकिस्तानातील स्टेडियम 'कोहली' नावाने दुमदुमले; बाबर चाहते भडकले

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत राशिद खान लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) संघाकडून खेळताना दिसले. त्याने 19 फेब्रुवारी इस्लामाबाद यूनाइटेड विरुद्ध अखेरचा सामना खेळला. या सामन्यात अफगाणिस्तान फिरकीपटूनं 4 ओव्हरमध्ये 19 धावा खर्च करुन 2 विकेट घेतल्या. यंदाच्या हंगामात 9 सामन्यात त्याने 13 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: BCCI Meeting : IPL शेड्यूलसह हे 10 विषय असतील पटलावर

यंदाच्या हंगामात स्पर्धेला अलविदा केल्यानंतर राशिद खान याने इंस्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत लाहोर कलंदर्सचे खेळाडू ग्राउंडवरुनच त्याला गार्ड ऑफ ऑनर (Guard of Honour) देताना पाहायला मिळते. याशिवाय राशिद खान नागिन डान्स करताना दिसते. आधी गार्ड ऑफ ऑनर आणि नंतर नागिन डान्सचा तडका असे चित्र मैदानात निर्माण झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो.

Web Title: Psl 2022 Rashid Khan Nagindance With Players Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..