
IPL आधी UAE त रंगणार पाकमधील स्पर्धा; वेळापत्रकही ठरलं!
PSL 2021 : कोरोनामुळे स्थिगित करण्यात आलेली आयपीएल (IPL 2021) स्पर्धा ज्याप्रमाणे युएईच्या मैंदानात रंगणारा आहे अगदी त्याच प्रमाणे पाकिस्तान सुपर लीग (PSL 2021) मधील उर्वरित सामने देखील युएईत रंगणार आहेत. पाकिस्तान सुपर लीगमधील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रकाची घोषणा नुकतीच करण्यात आलीये. कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे (Covid 19 Pandemic) पाकिस्तान सुपर लीग स्पर्धाही स्थगित करण्याची वेळ आली होती. पाकिस्तान बोर्डाने (PCB) उर्वरित सामन्यांचा कार्यक्रम यूएईत (UAE) फिक्स केलाय. सर्व सामने अबूधाबीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत.
आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानच्या स्पर्धेतील उर्वरित स्पर्धेतील 6 सामने डबल हेडर असतील. यातील पाच सामने सुरुवातीच्या टप्प्यातच घेण्यात येणार आहेत. अखेरचा डबल हेडर सामना हा 21 जूनला खेळवण्यात येईल. क्वालीफायर आणि इलिमिनेटर-1 असे दोन सामने एकाच दिवशी रंगतील. स्पर्धेतील फायनल सामना 24 जूनला खेळवण्यात येणार आहे.

गुणतालिकेत चौथ्या क्रमाकावर असलेल्या लाहोर कलंदर्स आणि तिसऱ्या क्रमांकावरील इस्लामाबाद युनायटेड यांच्यातील सामन्याने 9 जून पासून युएईच्या मैदानातील स्पर्धेला सुरुवात होईल. पाकिस्तान सुपर लीगमधील हा 15 वा सामना असेल. युनाइटेड आणि कलंदर्स संघाने बुधवारपासूनच सरावाला सुरुवात केली आहे. इतर संघ रविवारपासून सरावाला सुरुवात करणार आहेत. होटलच्या रुममध्ये 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर ज्या खेळाडू आणि स्टाफ मेंबर्सचे कोरोनाचे तीन रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्यांनाच सरावाची परवानगी देण्यात येणार आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार नेतृत्व करत असलेल्या कराची किंग्जने सर्वाधिक 3 सामन्यातील विजयासह अव्वलस्थान गाठले आहे. त्यांच्या खात्यात 6 गुण जमा आहेत. पेशावर जालमी, पेशावर जालमी, इस्लामाबाद जालमी आणि लाहोर कलंदर्स यांच्याही खात्यात प्रत्येकी 6-6 गुण असून ते अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. मुल्तान सुल्तान संघ आणि क्वेटा ग्टेडिएटर्स संघ प्रत्येकी 2-2 गुणांसह पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.