

Pune Grand Tour
sakal
सायकल स्पर्धेच्या पहिला टप्प्याचा मार्ग पिंपरी-चिंचवड, मावळ आणि मुळशीतून होता. गवताळ प्रदेश, वळणदार डोंगराळ रस्ते आणि धरणाचे विलोभनीय बॅकवॉटर अशा निसर्गरम्य, परंतु खडतर अशा मार्गावर सायकलपटूंचा कस लागला. ८७.२ किलोमीटरच्या आव्हानात्मक मार्गावर मंगळवारी चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा ल्यूक मडग्वे विजेता ठरला.