

Sports News
esakal
बारामती: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. मागील बारा वर्षांमध्ये आठ वेळा पुण्याने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपदाचा मान मिळवला आहे. केवळ चार स्पर्धा नागपूर, सातारा, अहमदनगर व जालना या शहरांत पार पडल्या. एकंदरीतच या स्पर्धेला पुण्यासारखा ग्लॅमर कुठेही मिळत नाही. हा ग्लॅमरपणा संघटना व मल्ल यांनाही हवा असतो. यामुळे पुणे हेच महाराष्ट्र केसरीचे माहेरघर ठरले आहे.