Basketball: तेरा वर्षांखालील राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा : पुणे, नागपूर, सातारा संघांची बास्केटबॉल स्पर्धेत आगेकूच
Pune vs Raigad U-13 State Basketball Championship: तेरा वर्षांखालील राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पुणे, नागपूर, सातारा, सोलापूर यांनी दमदार कामगिरी केली. रायगड, जळगाव, रत्नागिरी यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
पुणे : सोलापुर येथे सुरू असलेल्या तेरा वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटातून पुणे, नागपूर, सातारा, सोलापूर या संघांनी आपली आगेकूच कायम राखली आहे.