Asian Games : आशियाई यशात पुणेकर खेळाडूंची चमक; ४ सुवर्णपदके, १ ब्राँझसह देशाच्या ऐतिहासिक शतकी यशात योगदान

क्रिकेट, कबड्डी, टेनिस, स्केटिंग, बुद्धिबळ अशा क्रीडा प्रकारांमध्ये सहा पुणेकरांनी पाच पदकांची कमाई
Asian Games
Asian Games sakal

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत या वेळी भारताच्या ऐतिहासिक यशात पुणेकर खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. क्रिकेट, कबड्डी, टेनिस, स्केटिंग, बुद्धिबळ अशा क्रीडा प्रकारांमध्ये सहा पुणेकरांनी पाच पदकांची कमाई केली. यात चार सुवर्ण आणि एका ब्राँझ पदकाचा समावेश आहे.

चीनमधील हांग् चौऊ येथे ही स्पर्धा पार पडली. भारताने इतिहासात प्रथमच १०० पदकांचा टप्पा पार केला. यात पुणेकरांची कामगिरी अभिमानास्पद ठरली. सुवर्णपदक विजेत्या महिला कबड्डी संघात स्नेहल शिंदे हिचा समावेश होता. क्रिकेटमध्ये पुरुष व महिला या दोन्ही संघांनी सोनेरी यश संपादन केले. यात ऋतुराज गायकवाड आणि देविका वैद्य यांनी योगदान दिले. विशेष म्हणजे ऋतुराज हा संघाचा कर्णधार होता.

टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत ऋतुजा भोसले हिने अनुभवी स्पर्धक रोहन बोपण्णा याच्या साथीत सोनेरी यश प्राप्त केले. रोलर स्केटिंग खेळात भारताने प्रथमच पदक पटकावले. ३००० मीटर रिले शर्यतीत ब्राँझ पटकावणाऱ्या संघात विक्रम इंगळे आणि सिद्धांत कांबळे यांचा समावेश होता.

खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही वाटा

भारताच्या महिला बुद्धिबळ संघाने रौप्य पदक पटकावले. पुण्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे संघाचे प्रशिक्षक होते. ‘अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत भारताला चीनविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील महिला बुद्धिबळ संघाचे हे पहिलेच पदक आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे,’ अशी प्रतिक्रिया कुंटे यांनी व्यक्त केली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील महिला बुद्धिबळ संघाचे हे पहिलेच पदक आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे’, अशी प्रतिक्रिया कुंटे यांनी व्यक्त केली.

रोलर स्केटिंगच्या पहिल्याच पदकात माझा वाटा असल्याचा आनंद खूप मोठा आहे. आमच्या तीन खेळाडूंच्या संघात माझ्यासह पुण्याचाच विक्रम इंगळे आणि तमिळनाडूच्या आनंद कुमार या खेळाडूचा समावेश होता. आमच्या उत्तम समन्वयाने आणि कष्टामुळे हे पदक मिळाले.

— सिद्धांत कांबळे, स्केटर

आशियाई क्रीडा स्पर्धेला पात्र ठरण्यासाठी टेनिसपटूंना क्रमवारीतील चांगले स्थान कायम राखणे गरजेचे असते. त्यातील सातत्यामुळे मी पात्र ठरू शकले. त्यातच मिश्र दुहेरीत अनुभवी रोहन याने माझी जोडीदार म्हणून निवड केल्याने जबाबदारी वाढली होती. त्याच्यासह उत्तम समन्वय साधून देशाला सुवर्णपदक जिंकून दिल्याचा आनंद आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना मिळालेले हे यश खास आहे.

— ऋतुजा भोसले, टेनिसपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com