
Pro Kabaddi League 11: देवांक दलालच्या वर्चस्वपूर्ण चढाईच्या खेळावर प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा पायरेट्स संघाने सोमवारी पुणेरी पलटण संघावर ३७-३२ असा सफाईदार विजय मिळविला. पाटणा पायरेट्सचा संघ या विजयाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. पुणेरी पलटणचा बाद फेरी गाठण्याचा मार्ग मात्र खडतर बनला. अन्य लढतीत दबंग दिल्ली संघाने बंगाल वॉरियर्स संघावर ४७-२५ असा विजय साकारत प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. दबंग दिल्लीचा संघ ११ विजय व ७१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.