
PV Sindhu and Lakshya Sen Won Syed Modi International Title : पीव्ही सिंधूने रविवारी एकेरी बॅडमिंटन सामन्यात चीनच्या वू लुओ यू हीचा पराभव करत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले. तिने या सामन्यात २१-१४, २१-१६ असा विजय मिळवला. या स्पर्धेतील हे तिचे तिसरे विजेतेपद होते. याधी २०१७ व २०२२ मध्ये तिने विजेतेपद पटकावले होते. २०२३ मध्ये तिला दुखापतीमुळे स्पर्धा खेळता आली नव्हती. तर, अंतिम सामन्यात सिंगापूरच्या जिया तेहवर विजय मिळवून लक्ष्य सेनने आपले पहिले सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले. लक्ष्यने आपल्या प्रतिस्पर्ध्याला २१-६, २१-७ असे नमवले.