
पॅरिस : भारताची अनुभवी खेळाडू व दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने गुरुवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग झी यी हिला सरळ दोन गेममध्ये पराभूत करीत जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.