esakal | Tokyo Olympics: सिंधूची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

सिंधूची मेडल जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली...

sakal_logo
By
विराज भागवत

सिंधूने चीनच्या खेळाडून सहज धूळ चारत मिळवलं कांस्यपदक

Tokyo Olympics स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने कांस्यपदक पटकावले. तिने चीनच्या हे बिंगजिओ हिला २१-१३, २१-१५ अशा सरळ गेममध्ये धूळ चारली. सिंधूच्या विजयामुळे भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक पटकावलं. तसेच, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वेळा पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. सिंधूने सामना जिंकल्यावर भावनिक प्रतिक्रिया दिली. (PV Sindhu wins Bronze in Tokyo Olympics Badminton read her first emotional reaction vjb 91)

"सध्या माझा आनंद गगनात मावत नाहीये. मी खूप वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत आहे. मला असं वाटतं की आज मी छान खेळले. आताच्या क्षणाला माझ्या मनात अनेक भावना आहेत. कांस्यपदक मिळालं म्हणून मी खुश व्हावं की अंतिम फेरीत खेळता आलं नाही याचं मी दु:ख करावं हेच मला आता कळत नाहीये. माझ्या कुटुंबाने मला खूप सहाकार्य केलं. त्यांनी केलेल्या सहाकार्याबद्दल धन्यवाद. भारतीय चाहत्यांनीही माझ्यावर खूप प्रेम केलंय. त्यांचेही धन्यवाद. खेळताना मला खूप दडपण होतं पण मी शांत राहिले आणि माझा खेळ करत राहिले. मी सामन्यात आघाडीवर होते पण तरीही मी आरामात खेळत नव्हते. जिंकेपर्यंत मी माझा पूर्ण जोर लावला आणि पदक मिळवलं याचा मला आनंद आहे", अशी विजयानंतर सिंधूने पहिली प्रतिक्रिया दिली.

loading image
go to top