
सिंधूनं 2017 मध्ये सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धा जिंकली होती.
Syed Modi Badminton Title : नागपूरच्या फुलराणीला नमवत सिंधू बनली चॅम्पियन!
Syed Modi International tournament : दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) वर्षातील पहिली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. सय्यद मोदी इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत (Syed Modi International tournament) सिंधूनं भारताच्या मालविकाला (Malvika Bansod) एकहाती पराभूत करत महिला एकेरीची फायनल जिंकली. सिंधूनं सेमीफायनल लढतीत रशियाच्या एवगेनिया कोसत्सकाया हिला पराभूत करत फायनल गाठली होती. यापूर्वी सिंधूनं 2017 मध्ये सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धा जिंकली होती.
बाबू बनारसी दास बॅडमिंटन अकादमीमध्ये रंगलेल्या स्पर्धेतील फायनलमध्ये पीव्ही सिंधूसमोर आपल्याच देशातील मालविकाचे सोपे आव्हान होते. सिंधूनं सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पहिल्या पाच मिनिटांत सिंधूनं 3–0 अशी आघाडी घेतली. मालविका सिंधूसमोर चांगलीच संघर्ष करताना दिसले. सुरुवातीला सिंधूकडे 10–03 अशी मजबूत आघाडी असताना मालविकानं स्कोअर 10–08 पर्यंत आणला.
हेही वाचा: ICC Awards : आपल्या कॅप्टनला धोबीपछाड देत रिझवान ठरला किंग
मात्र सिंधून पुन्हा सातत्याने गुण घेत पहिला सेट 21–13 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मालविकानं अनुभवी सिंधूसमोर कमबॅख करण्याची क्षमता दाखवून दिली. तिने दुसऱ्या सेटमधील पाचव्या मिनिटात दोन आणि आठव्या मिनिटात स्कोअर सहा गुणांपर्यंत नेला. दुसऱ्या बाजूला सिंधूच्या खात्यात शून्य गुण होते. 12 व्या मिनिटाला सिंधूनं 6–6 बरोबरी केली. त्यानंतर दुसरा सेट तिने 21–16 असा खिशात घालत सामना जिंकला.
हेही वाचा: प्रितीला अलविदा करुन राहुल झाला मालामाल!
Web Title: Pv Sindhu Wins Syed Modi International Tournament Defeats Malvika Bansod In The Final
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..