FIFA World Cup : फुटबॉल खेळाडूंची टक्कर, नाकाचे हाड मोडले

FIFA World Cup
FIFA World Cupesakal

फिफा विश्वचषक 2022 मध्ये इराणच्या संघाची सुरुवात खराब झाली. खलिफा स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात इराणला इंग्लंडकडून 2-6 असा पराभव पत्करावा लागला. सामन्यादरम्यान, धक्कादायक घटना पाहायला मिळाली. लाईव्ह सामन्यातच आपल्या सहकाऱ्याला गोलकीपर जोरात धडकला. या धडकीमध्ये इराणचा गोलकीपर गंभीर जखमी झाला. त्याच्या नाकातून थेट रक्त वाहू लागले. (Qatar FIFA World Cup goalkeeper alireza beiranvand injury)

खेळाच्या 12व्या मिनिटाला गोलकीपर अलिरेजा बैरनवंद आणि त्याचा सहकारी खेळाडू माजिद हुसैनी या दोघांमध्ये जोरात टक्कर झाली. त्यामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. वैद्यकीय पथकाने उपचार केल्यानंतर, बॅरोनवंड थोड्या काळासाठी खेळात राहिला. पण 19व्या मिनिटाला तो पुन्हा मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर घेऊन मैदानाबाहेर नेण्यात आले.

नेमकं काय घडलं?

इंग्लंडचा संघ सुरुवातीपासूनच संधी निर्माण करत होता. सामन्याच्या 7:15 मिनिटाला इंग्लंडने डाव्या बाजूने आक्रमण केले आणि हॅरी केनने बॉल गोलपोस्टसमोर पाठवला. इराणच्या गोलकीपरने तो आडवण्याचा प्रयत्न केला. बॉल त्याच्या बोटाला लागला पण तो डायव्ह मारत होता. दरम्यान, त्याचाच सहकारी माजिद हुसैनीशी त्याची जोरदार धडक झाली. दोन्ही खेळाडू जमिनीवर कोसळले. या धडकीत अलिरेजा अधिक जखमी झाला. त्याच्या नाकातून सतत रक्त वाहत होते. त्याच्या रक्ताने त्याची कपडेदेखील माखली.

तातडीने वैद्यकीय पथक मैदानात दाखल झाले. त्याच्यावर उपचारदेखील करण्यात आले. त्यानंतर त्याने पुन्हा खेळण्यास सुरूवात केली. पण, काही सेकंदांनंतर त्याच्या लक्षात आले की आपण खेळू शकणार नाही आणि म्हणूनच त्याने बेंचकडे बोट दाखवले. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले. जोपर्यंत तो होता तोपर्यंत इराणने एकही गोल केला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com