
लास वेगास: भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने जगातील अव्वल क्रमांकाच्या बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव करत, ७,५०,००० डॉलर्स पारितोषिक असलेल्या फ्रीस्टाइल ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या अर्जुन एरिगसीनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.