

Chess Tournament
sakal
पाफोस (सायप्रस) : भारतातील एका कुटुंबातील सख्खे भाऊ-बहीण अनुक्रमे आर. प्रज्ञानंद व आर. वैशाली यांच्याकडून आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत कमालीच्या अपेक्षा होत्या; मात्र भाऊ आर. प्रज्ञानंद याला खुल्या गटात अवघ्या चार गुणांची कमाई करता आली असून तो ही स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे; मात्र त्याची बहीण आर. वैशाली हिने महिला गटात सहा गुणांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले आहे. दहाव्या फेरीअखेर आर. वैशालीकडे आघाडी असून उर्वरित चार फेऱ्यांमध्ये चमकदार खेळ केल्यास तिला जेतेपदाची आशा बाळगता येऊ शकणार आहे.