Athletics Integrity Unit : रचना कुमारीवर १२ वर्षांची बंदी

गेल्या वर्षी गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हातोडाफेकीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रचना कुमारीवर दुसऱ्यांदा उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याबद्दल जागतिक ॲथलेटिक्सच्या ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने (एआययू) १२ वर्षांची बंदी घातली आहे.
 रचना कुमारी
रचना कुमारीsakal

नवी दिल्ली : गेल्या वर्षी गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हातोडाफेकीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रचना कुमारीवर दुसऱ्यांदा उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याबद्दल जागतिक ॲथलेटिक्सच्या ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने (एआययू) १२ वर्षांची बंदी घातली आहे.

येत्या १ मार्च रोजी आपला ३१ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या रचना कुमारीची कारकीर्द या १२ वर्षांच्या बंदीमुळे संपुष्टात आली आहे. एआययूने गेल्या वर्षी ‘आऊट ऑफ कॉम्पिटिशन''मध्ये तिची उत्तेजक चाचणी घेतली होती. त्यात तिच्या नमुन्यात स्टॅनोझोलोल मेटॅंडिनोन आणि डीहायड्रोक्लोरोमेथॅटेस्टोटेरोन (डीएचसीएमटी) क्लेनबुटेरॉल हे उत्तेजक सापडले होते.

 रचना कुमारी
Ravindra Jadeja : खेळपट्टीचा अंदाज बांधणे कठीणच : जडेजा

तिच्यावर २४ नोव्हेंबर २०२३ पासून १२ वर्षांची बंदी टाकण्यात आली असून २४ सप्टेंबर २०२३ पासूनचे तिचे सर्व पुरस्कार, निकाल, पदके अपात्र ठरविण्यात आली आहेत, असे एआययूने म्हटले आहे. ती दुसऱ्यांदा डोपिंगमध्ये अडकल्याने तिच्यावर १२ वर्षांची बंदी टाकण्यात आली.

यापूर्वी १८ मार्च २०१५ ते १७ मार्च २०१९ या चार वर्षांसाठी तिच्यावर बंदी होती. एआययूने गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी पतियाळा येथे तिच्या युरिनचे दोन नमुने घेतले होते. कारण पहिल्या नमुन्यात तपासणीसाठी आवश्यक मात्रा नसल्याने दुसरा नमुना घ्यावा लागला, असे एआययूने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com