VIDEO: नदालने रशियन मेदवेदेवचा केला पराभव; चाहत्यांनी स्टेडियम सोडले दणाणून | Rafael Nadal beat Russian Daniil Medvedev Fans Celebrate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rafael Nadal beat Russian Daniil Medvedev Fans Celebrate

VIDEO: नदालने रशियन मेदवेदेवचा केला पराभव; चाहत्यांनी स्टेडियम सोडले दणाणून

मॅक्सिकन ओपनच्या (Maxican Open) सेमी फायनलमध्ये स्पेनच्या राफेल नदालने (Rafael Nadal) रशियाच्या (Russia) डॅनिल मेदवेदेवचा (Daniil Medvedev) 6-3, 6-3 अशा दोन सेटमध्ये सहज पराभव करत फायनल गाठली.

विशेष म्हणजे मेदवेदेवने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) नदालकडून फायनमध्ये मिळालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची वल्गना केली होती. मात्र राफेल नदालने दोन सरळ सेटमध्येच त्याला मात देत कोर्टवर अजूनही तोच बॉस असल्याचे दाखवून दिले. नदालच्या रशियन मेदवेदेववरील विजयानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. याचा व्हिडिओ सध्या व्हयरल (Video Viral) होत आहे.

हेही वाचा: Mexican Open: रशियाचा मेद्वेदेव स्पेनच्या नदालचा बदला घेण्यास सज्ज

राफेल नदालने सान्याच्या सुरूवातीपासूनच धडाकेबाज खेळ करण्यास सुरूवात केली होती. डॅनिल मेदवेदेवला त्याच्या पहिल्याच सर्व्हिस गेममध्ये दोनवेळा ब्रेक पॉईंटचा बचाव करावा लागला. त्यानंतर नदालने 3-1 अशी आघाडी घेतली. ही आघाडी त्याने कायम राखत पहिला सेट 6-3 असा जिंकला. पहिला सेट जिंकल्यानंतर नदाल दुसऱ्या सेटमध्येही चांगल्या लयीत दिसत होता.

हेही वाचा: Ranji Trophy: जुळ्या भावांचा 'डबल' धमाका; इतिहासात कधी न झाले ते घडले!

मात्र मेदवेदेवने आपल्या बॅकहँड ड्रोपशॉटचा चांगला वापर करत नदालला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मेदवेदेवने दुसऱ्या सेटमध्ये नदालच्या फक्त दोन सर्व्हिसमध्ये 11 ब्रेक पॉईंट मिळवले. मात्र अनुभवी नदालने दोन्ही सर्व्हिस राखल्या आणि मेदवेदेवचा पुनरागमनाचा प्रयत्न हाणून पाडला. अखेर नदालने दुसरा सेट 6-3 असा जिंकत फायनल गाठली. आता त्याचा सामना ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरिये याच्याबरोबर फायनमध्ये भिडणार आहे.

Web Title: Rafael Nadal Beat Russian Daniil Medvedev Fans Celebrate Win In Stadium With Standing Ovation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top